Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज आणखी एक कोरोना बाधित !

कोपरगाव  तालुक्यात आज आणखी एक कोरोना बाधित !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे 32 वर्षीय युवक हा आज कोरोना बाधित आढळल्याने तालुक्यासह कोकमठाण परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी असलेला 32 वर्षीय युवक हा कामानिमित्त पुणे येथे आपल्या जोडीदारा सोबत एका रूम मध्ये राहत होता. काल तो कोपरगाव येथे आल्यावर त्याला संस्थात्मक विलगिकरन कक्षात ठेवण्यात आले होते. पुणे येथील त्याच्या जोडीदाराला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यावर कोकमठान येथील युवकाची स्राव चाचणी केली असता आज ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाच्या वतीने शोध घेण्याचे सुरू आहे. सदर युवकास पुण्यावरून आल्याआल्या संस्थात्मक विलगिकरन कक्षात ठेवल्यामुळे संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा मोठा धोका टळला आहे तसेच करंजी येथील बधिताच्या संपर्कातील ६ जणांचे नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेल्यांची स्राव चाचणी अहवाल अजून प्रलंबित आहे. मात्र त्या ६ व्यक्तीची रॅपिड डायग्णाॅस्टिक किट द्वारे तपासणी करण्यात आली आहे त्यामधे ते सर्व निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले आहे.अजूनही बाधितांच्या संपर्कातील १४ जणांचे स्राव अहवाल नगर येथून प्राप्त होणे बाकी आहे. तर आज अजूनही बाधितांच्या संपर्कातील स्राव घेऊन चाचणीसाठी पाठविण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले आहे.कोपरगाव तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या आज अखेर २५ झाली असून त्यापैकी एक महिला मयत झाली आहे , 12 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे तर उर्वरित 12 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.