Breaking News

संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमधून मोटारसायकलची चोरी !

संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमधून मोटारसायकलची चोरी !
जामखेड प्रतिनिधी 
   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उभारलेल्या संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका व्यक्तीच्या मोटारसायकल चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 
यासंदर्भात मोटारसायकल चोरीचा गुन्हा जामखेड पोलिस स्टेशनला दाखल झाला आहे. 
    शहरातील जावेद बशीर शेख यांना पत्नीसह दि ८ जूलै रोजी आरोळे हाॅस्पीटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. ते बाहेरगावी जाऊन नातेवाईकांना भेटुन  मोटारसायकलवरून आले होते त्याच वेळी त्यांना कोराँन्टाईन करण्यात आले होते.  त्या वेळी त्यांच्या ताब्यातील बजाज पल्सर कंपनीची मोटारसायकल एम एच११ बीपी ५६७७ ही आरोळे हाॅस्पीटलमधील कंपाऊडमध्ये पार्क केली होती. दरम्यान ११ जूलै रोजी त्यांना पत्नीसह  डाॅ बाबासाहेब आंबेडकर हाॅस्टेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ते आपली मोटारसायकल घेण्यासाठी दि१७ जूलै रोजी आरोळे हाॅस्पीटलमध्ये गेले असता त्यांना त्यांची मोटारसायकल मिळवून आली नाही. त्यांनी हाॅस्पीटलमध्ये मोटारसायकलची शोधाशोध व चौकशी केली असता मोटारसायकल बाबत त्यांना ठोस माहिती मिळाली  समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यांनी तीन चार दिवस मोटारसायकलचा शोध घेतला असता कुठेच तपास न लागल्याने अज्ञात चोरट्याविरोधातजामखेड पोलिस स्टेशनला २१ जूलै रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोलमजुरी करणारया जावेद बशीर शेख यांनी आपल्या मोटारसायकलचा तपास लवकर लावण्यासाठी जावेद पोलिसांकडे वेगळा विनंती अर्जही केला आहे.