Breaking News

अकोले तालुक्यातील सात रुग्णांनी केली करोना वर मात !

अकोले तालुक्यातील सात रुग्णांनी केली करोना वर मात !

अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील सात करोना बाधितांनी आज करोना वर मात केली आहे  अकोले तालुक्यासाठी ही  दिलासादायक बातमी . आहे ..!
 अकोले  तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोज करोनाचे रुग्ण आढळत  आहे त्यात अकोले शहरात एका पक्षाचा पदाधिकारी करोना बाधित सापडला   त्या संदर्भातील मटण पार्टीची अकोल्यात  चर्चा चघळत राजकीय शेरेबाजी सुरू आहे यावरून भाजप आणि राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांमध्ये सवाल जबाब  नागरिकांची करमणूक करत आहे  शनिवार व रविवार  एकही रुग्ण बाधित  आढळुन आला नाही तर आज सोमवारी सकाळी तालुक्यातील  बाधित आढळलेल्या पैकी  सहा जणांचा  अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 तालुक्यात एकुण बाधित रुग्ण संख्या  ५८  असून त्यापैकी ४६ जण कोरोनामुक्त झाले दोघांचा मृत्यू झाला  तर १० जणांवर उपचार सुरु आहे
-----