Breaking News

सावधान..!करंजी परिसरात पुन्हा कोरोना !

सावधान!!करंजी परिसरात पुन्हा कोरोना.
करंजी/प्रतिनिधी :
लॉकडाउन चे नियम शिथिल झाल्यानंतर अनलॉक ची संकल्पना सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे शहरापासून ते आता ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यावर देखील कोरोना येऊन पोहोचला आहे.
  २० जून रोजी करंजी परिसरातील वस्तीवरील एक इसम त्यांचा चांदवड येथील मुलाच्या संपर्कात आल्याने चांदवड येथेच कोरोना  पॉसिटीव्ह आढळून आला होता तो आता 2 दिवसांपूर्वी पूर्णपणे बरा झाला असून त्या मुळे करंजीकरांनी व कोपरगाव तालुका प्रशासनाने देखील सुटकेचा श्वास घेतला होता परंतु काल दिनांक १४ जुलै रोजी परत एकदा करंजी परिसरात कोरोना ने डोकं वर काढले असून कोपरगाव वैजापूर रस्तालगत नऊ चारी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परजणे वस्ती शाळेच्या समोरील असलेली करंजी ग्रामपंचायत हद्दीतील दत्त नगर म्हणून सुमारे ५० कुटूंब राहत आलेल्या वस्तीवर एक ३४ वर्षीय महिला नाशिक येथील खाजगी रुग्णालयातील रिपोर्ट नुसार पॉसिटीव्ह आढळुन आली असून परत एकदा करंजी आणि कोपरगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
  सदर महिला ही काही दिवसांपूर्वी वैजापूर येथिल खाजगी रुग्णालयात आपल्या पोटाच्या उपचार घेत होती परंतु दोन दिवसांपूर्वी ती आपल्या पुढील ऑपरेशन साठी कोपरगाव मधील प्रसिध्द हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होती तेहवा पुढील ट्रीटमेंट च्या आधी तेथिल डॉक्टरानी तिची कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देऊन तिचे स्वाब नाशिक येथे खाजगी लॅब ला पाठवले असता काल रात्री उशिरा  तीचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आढळुन आला आहे अशी माहिती तालुका वैदयकीय अधिकारी डॉ संतोष विधाते यांनी  दिली.
   सदर घटनास्थळी रात्री उशिरा तहसीलदार श्री योगेश चंदरे साहेब , तालुका विस्तार अधिकारी श्री माळी साहेब,ग्रामसेवक श्री गुंड भाऊसाहेब,कोरोना संरक्षक समिती अध्यक्ष श्री रवींद्र आगवन, आरोग्य सेविका श्रीम परदेशी मॅडम सर्व प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेने भेट दिली असून सदर महिलेच्या फर्स्ट कॉन्टॅक्ट म्हणून संपर्कातील तिच्या ८ ते १० लोकांना कोपरगाव येथील केअर सेंटर मध्ये पुढील तपासणी साठी ताब्यात घेतले असून, मा तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार सदर परिसरात योग्य त्या उपाय योजना करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून मा तहसीलदार साहेब कोपरगाव यांच्या आदेशानुसार कन्टेनटमेंट झोन म्हणून वैजापूर रोड चा शिंदे मळा व नावगिरे वस्ती घोषित करून परिसर सील करण्याचे काम सुरू करण्यात आले असून सदर परिसरातील संपूर्ण दत्त नगर परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे पुढील कार्यवाही प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.