Breaking News

कोपरगाव पोलिस कारागृहात कोरोनाची एंट्री ५ कैदी कोरोना बाधित !

कोपरगाव पोलिस कारागृहात कोरोनाची एंट्री ५ कैदी कोरोना बाधित !
करंजी प्रतिनिधी-  
आज कोपरगाव केअर सेंटर मध्ये रॅपिड अँटीझेन किट द्वारे एकूण १७४ कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून यात १२ पॉजिटीव्ह १६२ निगेटीव्ह आढळून आले असून यात कोपरगाव येथील ग्रामिण पोलिस स्टेशन मध्ये ४ तर शहरी पोलिस स्टेशन मध्ये १ कोरोना बधित कैदी आढळुन आले तर इतर तालुक्यातील व शहरातील भागात ७  रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे
     मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसून येत असल्याने यातून आता कोपरगाव कारागृह देखील सुटले नसून कोपरगाव कारागृहातील आज एकूण ६१ कैदी व ७ पोलिस कर्मचाऱ्याची कोरोना अँटीझेन रॅपिड टेस्ट केली असता त्यात ५ आरोपी कोरोना बधित आढळुन आले असून त्यातील ७ पोलिस व ५६ कैद्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. यात मागील काही दिवसांपूर्वी रस्ता लुटीत अटक केलेल्या ४ आरोपींचा समावेश असून हे ४ ही आरोपी ग्रामिण पोलिस स्टेशन च्या कक्षेत येतात,  तर शहर पोलिस स्टेशन मधील १ आरोपी कोरोना बधित असून त्याचा संबंध मालेगाव या गावाशी संबंधित आहे.बाकी सर्व कैद्यांना विलगिकरण कक्षेत ठेवण्यात आले आहे.
    त्या मुळे आता कोपरगाव मधील एकमेव सुरक्षित ठिकानाला देखील कोरोनाने विळखा घेतला असून त्या मुळे कोपरगाव करांनी अजूनही काळजी घेणे गरजेचे असून जे आपल्यासाठी २४ तास रस्त्यावर उभे असतात आज त्यांचाच घरात कोरोना शिरल्याने आता आपणच आपली काळीजी घेणे गरजेचे आहे.
  तर उर्वरित कोपरगाव मध्ये ७ रुग्ण आढळुन आले असून यात  स्वामी समर्थ नगर-१ महिला, इंदिरा नगर- १ पुरुष,गोरोबानगर- १ महिला,समता नगर- १ पुरुष, कोळपेवाडी-१ पुरुष, व गांधीनगर भागात प्रत्येकी १ पुरुष व  १ महिला रुग्ण आढळून आल्याने आज एकूण १२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले.असल्याने घरी रहा सुरक्षित रहा कोपरगाव तालुका प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे.