Breaking News

नेवासा - मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार, नेवासा बुद्रुक येथील प्रकार; चौघांना आरोपींना अटक एक फरार !

नेवासा - मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार,नेवासा बुद्रुक येथील प्रकार; चौघांना आरोपींना अटक एक फरार
नेवासा तालुका प्रतिनिधी :
 एका चोवीस वर्षीय मनोरुग्ण  तरुणीवर पाच नराधमांनी ऊसात नेऊन वेळोवेळी बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना नेवासे बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या मोठ्या बहिणीच्या फिर्‍यादिवरून नेवासे पोलिसांत पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक फरार आहे. 
याबाबत माहिती अशी, सदर मुलगी मनोरुग्ण असल्याने ती रात्री-अपरात्री घराबाहेर फिरत होती. तिच्या मनोरुग्णपणाचा गैरफायदा घेत पाचही आरोपींनी एप्रिल २०२० ते  ०५ जुलै २०२०पर्येंत गावच्या स्मशानभूमि जवळच्या शेतातील ऊसात नेऊन वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. 
या प्रकरणी मुलीच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या फिर्‍यादिवरून नेवासा पोलिसांत आरोपी महेश ऊर्फे बाळु अशोक गोंजारी (वय २८), संदीप झुंबर जरे (वय ३८), रामेश्वर गुलाब सोनटक्के (वय २७), कैलास गंगाधर जाधव (सर्व राहणार नेवासे बुद्रुक, ता. नेवासा), भारत चिमाजी इरले (वय ३८, राहणार नेवासा खुर्द) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. वरील आरोपी पैकी कैलास गंगाधर जाधव हा फरार असून इतर चार आरोपींना नेवासे पोलिसांनी अटक केली आहे.
--------------------
  आरोपी संख्या वाढणार.!
दरम्यान या तरुणीच्या मनोरुग्णतेचा गैरफायदा घेत अनेकांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिस त्याच दिशेने तपास करत असून यात निष्पन्न होणार्‍या सर्व नराधमांवर कठोर कारवाई करण्यात येईल.