Breaking News

महाराष्ट्र प्रदेश तैलीकच्या महामंत्रीपदी ज्ञानेश्‍वर दुर्गुडे यांची निवड !

महाराष्ट्र प्रदेश तैलीकच्या महामंत्रीपदी ज्ञानेश्‍वर दुर्गुडे यांची  निवड 
अकोले/ प्रतिनिधी :
देशपातळीवरील कार्यरत असलेल्या अखील भारतीय तेली राठोड महासभेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश महामंत्रीपदी ज्ञानेश्‍वर लक्ष्मण दुर्गुडे यांची निवड  करण्यात आली.
श्री दुर्गुडे हे अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील सुपुत्र असून त्यांनी   अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले .सध्या पुणे येथे नोकरी करत आहे. नोकरी करत असताना त्यांनी तेली समाजातील मुले, नागरिक, जेष्ठ नागरिक, वधु - वर परिचय मेळावे गुणवंत विद्यार्थी गौरव यांसारखे विविध उपक्रम राबवून समाज बांधणीचे योगदान व  निरंतर काम सुरु आहे. त्यांच्या या धडपडीची राष्ट्रीय अध्यक्ष उमेश साहु, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुनील साहु, राष्ट्रीय महामंत्री राजमोहन मोदी, प्रदेशाध्यक्ष रतीलाल, युवा प्रदेशाध्यक्ष विवेक परदेशी, राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष एस.पी. गुप्ता आदिंनी दखल घेत त्यांनी भारतीय तैलीक महासभेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश महामंत्री म्हणून निवड करुन गौरविण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल अकोले, संगमनेर, राहुरी, नेवासा, मुंबई, नाशिक, पुणे जिल्हयात त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.