Breaking News

वंचित बहुजन आघाडी तर्फे आदिवासी भागात जीवन आवश्यक वस्तू चे वाटप

अकोले/प्रतिनिधी :
हे आहेत प्रविण धांडे आणि सपना धांडे हे आकोल्याच्या आंबेवंगण ह्या छोट्याशा खेडेगावात राहतात.. लॉकडाऊन च्या काळात ह्या जोडप्याने आणि त्यांच्या टिम ने गावाखेड्यात जाऊन आपल्याला होईल तशी मदत केलीय.. ह्यात आदिवासी पाड्यातल्या आदिवासी, महादेव कोळी, ठाकर, भिल्ल ह्या समाजातल्या लोकांना जंगल विभागात जाऊन म्हणजे जिथे कुणी फीरकणार हि नाहि अशा ठीकाणी आपला जीव मुठीत घेऊन हे तिथे जात होते तब्बल २० किलोमिटर च अंतर पायी चालून कधी बोटिने जाउन त्या विभागातल्या लोकांना मदत करत आहेत. ज्या कुटुंबात त्या कुटुंबप्रमुखाला २ आठवडे घराबाहेर राहुन काम केल तरच घरात जेवणाचा प्रश्न सुटतो अशा कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे. त्या वस्त्यांच्या जवळपास कोणताच दवाखाना नाहि अशा ठीकाणी जाऊन त्यांनी लोकांना मदत केली.
काहि दिवसांआधी प्रविण दादांचा मला मेसेज आला. त्या वस्तीत ३०० कुटुंबांना मदत हवी आहे अस सांगितल. तेव्हा मी जितरत्न पटाईत दादा ह्यांना संपर्क साधून परिस्थिती सांगितली. त्या वस्त्यांमधील ३०० कुटुंबाना वंचित बहुजन आघाडी तर्फे जीवनावश्यक वस्तू आणि  सामान पोहोचवण्याच काम यशस्वी रीत्या झाल आहे.
पण हे इतक्यात संपणार नाहि आहे मित्रांनो.. ह्या प्रशासनाने इथल्या लोकांना मरायला सोडलय आणि त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडून कशी मदत करता येईल त्याच हे जोडप प्रयत्न आहे.
वंचित बहुजन आघाडी सत्तेत नसतानाही या लाॅकडाऊन च्या काळात पूर्ण ताकदीने महाराष्ट्र भर गरजू लोकांना मदत करीत आहे.. या गरजू समाजाच्यामागे वंचित बहुजन आघाडी ठाम पणे उभी आहे.. आणि त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, व यापुढेही करत राहील.