Breaking News

पाथर्डी शहरातील फुलेनगर,भगवान नगर परिसर प्रशासनाने केला सील

पाथर्डी/प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील फुलेनगर येथील विद्या कॉलनी मधील ७५ वर्षीय महिलेचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी कोरोना पॉझिटीव्ह आला.याच पार्श्वभूमीवर फुलेनगर परिसरातील सर्व मार्गे प्रशासनाने शनिवारी बंद केले असुन,हा भाग पुढील आदेशापर्यत सिल करत  कंटनमेंट झोन घोषित केला आहे.
       फुलेनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चार जणांना तसेच खेर्डे येथील  रुग्णांचा संपर्कात आलेल्या सहा जणांना आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे.त्यांचे घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे यांनी दिली.
            तालुक्यात गेल्या तीन दिवसांत ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली असुन,फुलेनगर व खेर्डे येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १० जणांच्या अहवालाकडे तालुक्यातचे लक्ष्य लागले आहे. प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार नामदेव पाटिल यांनी तालुक्यातील नागरीकांना केले आहे.