Breaking News

पाथर्डीत शुक्रवारी पुन्हा २० जण कोरोनाबाधित; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी पाथर्डीला आज देणार भेट ?पाथर्डीत शुक्रवारी पुन्हा २० जण कोरोनाबाधित; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी पाथर्डीला आज देणार भेट ?

पाथर्डी/प्रतिनिधी : 
तालुक्यात दोन दिवसांत ६२ रुग्णांची नोंद झाली असुन, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पाथर्डीला आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे भेट देणार असल्याबाबत माहिती मिळत आहे.
     काल पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालय येथे ९१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.त्यामध्ये दिवसभरात २० रुग्ण कोरोनाबधित आढळून आले आहेत.या २० रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे शहरातील आहेत.तर गुरुवारी एकाच दिवसात तालुक्यात ४२ रुग्ण आढळून आले होते.आता तालुक्याचा आकडा ८० वर पोहचला आहे.तर यामधील ६९ जणांवर उपचार चालु आहेत.
      तसेच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठा प्रमाणात वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन तालुक्यात कोणताही व्यक्ती बाहेरुन प्रशासनाची परवानगी न घेता व आरोग्य तपासणी न करता गावात आल्यास व त्या व्यक्तीस कोणी आसरा दिल्यास त्या दोघांवर आदेशाची उल्लंघन केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याबाबत तहसीलदार नामदेव पाटील यांनी आदेश काढला आहे.
          एकंदरीत पाथर्डीत दोन दिवसांत वाढलेल्या रुग्णांच्या संख्येवरून या रुग्णांचा आकड्याचा गुणकार होऊ नये म्हणून प्रशासन आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.तहसिलदार नामदेव पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी व सर्व प्रशासकीय यंत्रणा यासाठी हे आपल्या परीने प्रयत्न करत आहेत.परंतु पाथर्डीतील नागरिक लॉकडाऊन असुनही विनाकारण शहरात फिरताना आढळून येत आहेत.