Breaking News

संत निळोबाराय विद्यालयाचा १०० टक्के निकाल !

संत निळोबाराय विद्यालयाचा १०० टक्के निकाल
निघोज प्रतिनिधी :
   पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील प्रयत्न शिक्षण संस्थेच्या संत निळोबाराय विद्यालय पिंपळनेरचा निकाल शंभर टक्के लागला आहे .
   या  विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक कु .जेक्टे सिध्दी हिस ९० .८० टक्के, द्वितीय क्रमांक कु .कळसकर विशाखा हिस८४.६० टक्के तर तिसऱ्या क्रमांकात कळसकर यश व गुंजाळ दिक्षा यांस८२ .८०टक्के गुण मिळाले आहे . शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे . तसेच मुख्याद्यापक सेवक वृंद व संत निळोबाराय विद्यालयाचे सचिव श्री .सागर भास्करराव रासकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले .