Breaking News

पिंपळगाव खांड चे राजकीय जलपूजन ! पिचड - लहामटे'नी उडविले आरोपांचे तुषार

अकोले प्रतिनिधी-
     मी चाळीस वर्षात काय केले हा विरोधकांचा आरोप माजी मंत्री मधुकर पिचड यांनी खोडला , तालुक्यात पिंपळगाव खांड सारखे अनेक धरणे बांधून तालुका सुजलाम सुफलाम केला  आज शेतकरी त्याच्या पायावर भक्कम उभा आहे मात्र विरोधकांनी काय केले त्याचे एक उदाहरण दाखवा , तालुक्यात आजही पाणी घडविण्याच्या  १०  साईट आहे विरोधकांनी एखादे धरण किंवा बंधारा  बांधून दाखवावा असे आवाहन माजीमंत्री पिचड यांनी केले.
अकोले तालुक्यायील  मुळा व संगमनेर तालुक्यायील पठार भागाला वरदान ठरलेले  पिंपळगाव खांड धरण हे ओव्हर फ्लो झाले असल्याने त्याचे जलपूजन माजीमंत्री तथा भाजपचे राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य  मधुकरराव पिचड . माजीआमदार वैभवराव पिचड ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .धरणाच्या पाण्याचे पूजन  साडी चोळी जलाशयात अर्पण करण्यात आली.यावेळी माजी मंत्री पिचड यांनी   जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्ज बाबत घेतलेल्या  धाडशी निर्णयाचे स्वागत  केले. प्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड  सीताराम पा.गायकर , सीताराम पाटील देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .पत्रकारांशी वार्तालाप करताना माजीमंत्री पिचड म्हणाले, मी तालुक्यात १३ लघु व माध्यम २ अशी १५ जलाशयाची साखळी उभी केली. त्यामुळे शेतीला पाणी , पिण्यासाठी पाणी , उपसासिंचन योजना काही खाजगी , सामुदायिक पाणी पुरवठा योजना, त्यासाठी राज्य सरकार कडून निधीची उपलब्धता केली . त्यामुळे शेती शिवार हिरवे झाले . शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात आमूलाग्र बदल झाला हा बदल कसा झाला हे विरोधकांनी पाहावे म्हणे ४० वर्षात काय केले? .विरोधकांना माझे आव्हान आहे की, तुम्ही एक तरी धरण बांधून दाखवा मी जागा दाखवतो तालुक्यात खेतेवाडी , फोफसंडी , (खरचुंडी ) केळी ,वागदरी ,तळे  , अप्पर आंबित , मेहदुरी (घोगस ),मान्हेरे  (माकडडोह ) एकंदर (पिंपळदरा वाडी ) अशी दहा ठिकाणे आहेत त्यातील एक तरी मंजूर करून मार्गी लावा, तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा. मात्र खोटे बिनबुडाचे आरोप करू नका, असा सल्ला विरोधकांना दिला . यावेळी अगस्ति चे संचालक मच्छिन्द्र धुमाळ , महेश नवले , प्रकाश मालुंजकर , बाळासाहेब ताजने , राजेंद्र डावरे ,अशोक देशमुख ,सरपंच भाऊसाहेब शेटे , भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,अगस्तीचे कार्यकारी संचालक भास्कर घुले उपस्थित होते .
------    
पिचड यांनी  पिंपळगावखांड धरणाचे जलपुन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यमान आमदार डॉ किरण लहामटे  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा.अशोकराव भांगरे , यांनी पिंपळगाव खांड धरणाचे जलपुजन केले यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अमित दादा भांगरे ,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भानुदास .तिकांडे , मा.महेश तिकांडे, म.रवी मालुंजकर,.रामहरी चौधरी, .संतोष नाईकवाडी  यासह सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते पिंपळगाव  खांड धरणाचे काम पूर्ण होण्यास खरे श्रेय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे  आहे 40 वर्षात विकास  कामांचे श्रेय पिचड यांचे नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे शरद पवारामुळे तालुक्यातील प्रकल्प मार्गी लागले असल्याचा दावा डॉ किरण लहामटे -अशोक भांगरे  यांनी केला आहे 
----------
अनेक वर्षांपासून पिंपरकनेपुलाचे  कां रखडले आहे  प्रवरा नदीवरील पिंपरकने पुलाच्या कामाचा पहिला  स्लॅब टाकण्याचा कामाचा शुभारंभ  देखील दोन्ही  राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या वेळी झाला आमदार डॉ किरण लहामटे यांनी पहाटे पाच वाजता तर  माजी आमदार वैभव पिचड यांनी सकाळी 10 वाजता  पिंपरकने पुलाच्या कामाचा  स्लॅब टाकण्याचा शुभारंभ केला दोन्ही  पक्षाकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे 

गिरीश महाजन यांच्याकडून निधी आणला : पिचड

अकोले तालुक्यात यापूर्वी विरोधी पक्षातील आमदार असल्याने कामे होत नव्हती. विकास निधी न मिळाल्याने तालुक्यातील सर्व विकास कामे ठप्प होती. पिंपरकणे पूल आवश्यकच होता म्हणून त्या वेळी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जाऊन या पुलासाठी निधी आणला होता. त्यामुळेच भाजपमध्ये गेलो. परंतु याचे श्रेय आता इतर लोकप्रतिनिधी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पहाटे अंधारात येवून कुणी नारळ वाढवून श्रेय घेत असतील, तर हे हस्स्यास्पद आहे, अशी टीका माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.

मी पाठपुरावा केल्यामुळे निधी : आमदार डाॅ. लहामटे

पिंपरकने पुलाचे काम निधी अभावी गेले अनेक दिवस बंद होते. या सहा महिन्यांत मी विधामंडळात हा प्रश्न प्राधान्याने मांडला व त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे निधी उपलब्ध झाला. हे काम 2022 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य आहे. काल पहाटे पाच वाजता या पुलाच्या स्लॅबच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ केला केला आहे. तसेच तालुक्यातील अन्य कामांनाही गती देण्यात येईल. असे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी  म्हटले आहे.