Breaking News

नाटेगाव ग्रामपंचायत शौचालय घोटाळ्याची चौकशी व्हावी !

नाटेगाव ग्रामपंचायत शौचालय घोटाळ्याची चौकशी व्हावी !
कोपरगाव  / तालुका प्रतिनिधी 
 कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील ग्रामपंचायतीच्या शौचालयांच्या कामात गैरव्यवहार झाला असुन गेली पाच वर्षापासुन गावात झालेल्या शौचालयांच्या कामांची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नाटेगाव येथील रहिवासी नितीन पोळ सह  ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
  निवेदनात म्हटले आहे की  नाटेगाव येथील संबंधित लाभार्थींनी ग्रामसेवक व सरपंचांना हाताशी धरून शौचालयाचे अनुदान लाटल्याचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे  या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येणार आहे यामध्ये अनेक लाभार्थीनी प्रत्यक्ष शौचालय बांधलेले नाही अनेक लाभार्थीनी जुने शौचालय दाखविलेले, तसेच एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी ना अनुदान दिले आहे 
प्रत्येक लाभार्थींना १२ हजार रुपये अनुदान दिलेले आहे मात्र सदर ग्रामपंचायती कडे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रत्यक्ष सुविधा व त्या साठी स्वतंत्र कर्मचारी नेमलेला असताना सदर फॉर्म भरण्यासाठी व कागद पत्रासाठी प्रत्येकी काही रक्कम  वसूल केली आहे तसेच सदर योजनेत काम पूर्ण नसताना संगनमत करून काम पूर्णत्वाचे दाखले दिले आहे विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील आई वडील व मुलगा असे दोन चार लाभ एकाच कुटुंबात दिले आहे सदर योजनेचा फॉर्म भरताना या योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला आहे किंवा नाही या आशयाची माहिती भरताना शासनाची फसवणूक करण्याच्या दृष्टीने खोटी माहिती देऊन लाभ घेतलेले आहे यात स्थानिक तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक ,व पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाचा सहभाग असून त्यामुळे स्थानिक पंचायत समितीचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून निःपक्षपाती पणे चौकशी करण्याची शक्यता नाही त्यामुळे या योजनेची चौकशी करताना अन्य ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी यांची नेमणूक करून ग्राम पंचायत हद्दीतील प्रत्यक्ष नोंदणीकृत घर मिळकती, प्रत्यक्ष लाभ घेतलेले लाभार्थी , या पूर्वी बांधकाम झालेले शौचालये त्या करिता घेतलेले अनुदान, नवीन अर्ज दिलेले लाभार्थी प्रत्यक्ष झालेले काम, पूर्णत्वाचे दिलेले दाखले यांची पाहणी व पंचनामा व जबाब घ्यावे त्याच प्रमाणे प्रत्यक्ष घेतलेले जबाब व कागदोपत्री असलेली माहिती यांची पडताळणी करून संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करावे  कागदावर अलबेल असलेल्या या योजनेतून गावची स्वच्छता होण्यापेक्षा सरकारी तिजोरीची स्वच्छता झाल्याचे दिसून येईल असेही निवेदनात म्हटले

शौचालया संदर्भात ग्रामपंचायती कडे नागरिकांचे  अर्ज आल्यानंतर, तसे प्रस्ताव पंचायत समिती कडे पाठवण्यात आले मंजुरी मिळाल्या नंतरच लाभार्थ्यांच्या शौचालयाची कामे चालु करुन टप्प्या टप्प्याने जसजसे काम होईल तसे आॕनलाईन फोटो कडून सादर केले काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बॕक खात्यात पैसे जमा झाले गावात जेवढी प्रत्यक्षात कामे झाली तेवढ्या लाभार्थ्याना त्यांचे पैसे मिळाले त्यांची कुठलीही तक्रार नाही
---------
      अर्चना औचीते
ग्रामसेविका नाटेगाव ग्रामपंचायत