Breaking News

ब्राम्हणगावात मुखपट्टी न बांधणा-या नागरिकांवर पोलिसांची कारवाई !

ब्राम्हणगावात मुखपट्टी न बांधणा-या नागरिकांवर पोलिसांची  कारवाई !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव तालुक्यात कोरोना विषाणूची साथ अजूनही वाढत असून त्या साठी पोलिसांनीही आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून मुखपट्टी न बांधता  गावात फिरणा-यांवर  कोपरगाव तालुका पोलिस  स्टेशनचे पोलिस  निरीक्षक   अनिल कटके यांनी कारवाई  केली.
   तालुक्यातील  ब्राम्हणगाव येथे  पोलीस निरीक्षक     अनिल   कटके  यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आंधळे  , वाहतूक विभागाचे  पवार श्री.  सांगळे  यांनी गावात येऊन बारा नागरिकांवर मुखपट्टी न बांधल्याबाबत गुन्हे दाखल केले.त्यामुळे  ब्राम्हणगावातील बेशिस्त नागरिकांनी या कारवाईचा आता चांगलाच धसका घेतला असुन गावात फिरताना मुखपट्टी न बांधता फिरणारे आता मुखपट्टी बांधताना दिसत आहे तालुका लॉकडाऊन असताना ब्राम्हणगावकरांनीही कडकडीत गावासह मंदिरे बंद करुन नियमांचे काटेकोर पालन करुन इतर गावांपुढे आदर्श निर्माण केला होता त्यानंतरही गावात शासनाने घालुन दिलेल्या  नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे माञ काही महाभागांना सांगूनही आपल्या आरोग्याची काळजी वाटत नाही ते तोंडावर मुखपट्टी न बांधता फिरतात अशा दुचाकी वरून प्रवास करणाऱ्यांवर   पोलिसांनी  कडक कारवाई करत गुन्हे दाखल केले या कारवाईचे ब्राम्हणगावातील सुज्ञ  नागरिकांनी स्वागत केले आहे.तर कोरोना महामारी आजाराचा दिवसेंदिवस  तालुक्यातील ग्रामिण भागातही फैलाव होत असुन ग्रामस्थांनी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळण्याबरोबरच एकाच ठीकाणी जास्त गर्दी करु नये सुरक्षित अंतराचे पालन करा आपल्या आरोग्य सांभाळावे कामा व्यतीरीक्त फिरणे टाळावे आपण सुरक्षित रहा व गावालाही सुरक्षित ठेवा असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी ग्रामस्थांना यावेळी  केले