Breaking News

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी नागरीकांनी क्वारंटाइन सेंटरमधे रॅपीड टेस्ट करुन घ्याव्यात - सभापती सुनिता दौंड

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी नागरीकांनी  क्वारंटाइन सेंटरमधे रॅपीड टेस्ट करुन घ्याव्यात  - सभापती सुनिता दौंड 
खरवंडी कासार   / प्रतिनिधी :
कोरोनाचा हाहाकार जगात सुरु असताना भारतात व महाराष्टात कोरोणाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे अहमदनगर जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल ञिवेदी यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतंर्गत शिथलिता दिली होती परंतु कोरोणाचा समूह संसर्ग दिवसेदिवस वाढत असुन त्याचा फटका दुरदैवाने पाथर्डी तालुक्यालाही बसला आहे यामुळे पाथर्डी तालुक्यात कोरोणाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे पाथर्डी शहरात मागील तीन दिवसात कोरोणाग्रस्तांची संख्या एकशे दहा पेक्षा जास्त झाली आहे याधर्तीवर  पाथर्डीतील श्रीतीलोक जैन विद्यालय क्वारंटाइन सेंटर येथे विलगीकरण कक्षात कोरोणा रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे पाथर्डी तालुक्यात कोरोणाचे लक्षण जाणवल्यास वेळ न दडवता स्वताहुन कोरोणाचे स्वॅब देत रॅपीड टेस्ट करुन घ्यावी असे आवहान पंचायत समिती सभापती सुनिता दौंड गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे आरोग्य अधिकारी भगवान दराडे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी केले आहे 

     पाथर्डी तालुक्यातील नागरीकांनी अत्यावश्यक सेवा वगळुन बाहेर जाणे टाळावे व्यापारी व्यावसायिकांनी स्वताहुन स्वंयस्फुर्तेने लाॅकडाउन पाळण्याची गरज आहे तसेच आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी जेणेकरुन लवकरात लवकर कोरोणाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश प्राप्त होइल  
-----
-  नामदेव पाटील तहसिलदार पाथर्डी