Breaking News

नाटेगावातुन बेकायदेशीर गौण खनीजाचा उपसा, गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी !

नाटेगावातुन बेकायदेशीर  गौण खनीजाचा उपसा, गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी !

 कोपरगाव / लक्ष्मण वावरे :
    कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील गारदा नदी व परीसरातुन अवैद्य पणे जेसीबी ,डंपर च्या सहाय्याने ग्रामपंचायतच्या काही पदाधिका-यांच्या अर्थपूर्ण संबधाने मुरुम ,माती उपसा दररोज होत असुन महसुल विभागाचे या अवैद्य उपस्या कडे सपशेल दुर्लक्ष होत असुन कर्तव्य दक्ष तहसिलदार योगेश चंद्रे यांनीच उपसा होत असलेल्या ठीकाणाचे पंचनामे करुन उपसा करणारे व त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन दंड करण्याची मागणी नाटेगाव ग्रामस्थानी केली आहे.
    ग्रामस्थांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे की गारदा नदी , ग्रामपंचायतचे राखीव वन सर्व्हे नंबर २७३ व ग्रामपंचायतच्या हद्दीतुन जेशीबी मशीनच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे करुन मुरुम माती काठुन वहातुक केली जाते यासाठी ग्रामपंचायत अथवा ग्रामसभेचा कोणताही ठराव झालेला नाही दररोज हा उपसा होत असल्याने भविष्यात नदीला पुराचे पाणी आलेतर नदीपाञ बदलु शकते असे अर्जदार ग्रामस्थांचे म्हणने असुन ग्रामपंचायत कार्यालया समोरुनच मुरुमाचे डंपर जातात याकडे ना ग्रामपंचायतचे लक्ष ना महसुलचे नाटेगाव ज्या येसगाव तलाठी सजा  अंतर्गत येते त्या सजेतीलच एका गावातील ग्रामस्थांच्या तक्रारी वरुन अवैद्य गौण खनीज वहातुकी वरुन ग्रामपंचायतच्या एका पदाधिका-याच्या नातेवाईकावर तत्कालीन  तहसिलदारांनी पसत्तीस लाखांचा दंड करुन गुन्हा दाखल केला होता तोच न्याय नाटेगाव येथेही करावा म्हणजे परत कौणी तहसिलच्या परवानगी व रॉयल्टी शिवाय अवैद्य गौण खनीज उपसा करणार नाही तरी कोपरगाव तहसिलदारांनी नाटेगावातुन मुरुम,माती उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी  ग्रामस्थांनी केली आहे तर काही ग्रामस्थ यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचीही भेट घेणार आहे.
दरम्यान शुक्रवार दिनांक १७ जुलै रोजी तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या आदेशावरुन येसगाव सजा नाटेगावच्या तलाठी श्रीमती कव्हळे या सदर उत्खनन ठीकाणी गेल्या असता त्या ठीकाणी डंपर  आढळुन आला व कारवाई च्या भितीने ड्रायव्हर ने तो पळुन नेला .

" संबंधित गावच्या कामगार तलाठी यांना गौणखनीज उपसा झालेल्या जागेचा पंचनामा करण्यासाठी पाठविले रितसर पंचनामा केलेला असुन पुढील कार्यवाही करण्यात येईल."
--------------
योगेश चंद्रे
तहसिलदार कोपरगाव 

संबंधीतांनी ग्रा.पं.ला दिलेल्या अर्जावरुन ग्रा.पं.ने त्यांना पञ दिले की तहसिलदारांच्या परवानगीनेच स्वामीत्व धनाची रक्कम भरुन परवानगी घ्यावी अश्या प्रकारचे ग्रा.पं.ने पञ दिले असुन मुरुम अथवा माती उपसा करण्याची कुठलीही परवानगी दिली नाही.
-----------
    अर्चना औचीते
ग्रामसेविका नाटेगाव ग्रामपंचायत