Breaking News

शेतक-यांच्या प्रश्नावर युवा नेते विक्रम पाचपुते आक्रमक; आमदार बबनराव पाचपुतेंच्या मार्गदर्शनाखाली करणार आंदोलन !

शेतक-यांच्या प्रश्नावर युवा नेते विक्रम पाचपुते आक्रमक; आमदार बबनराव पाचपुतेंच्या मार्गदर्शनाखाली करणार आंदोलन !
श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी :
    सद्यस्थीतीत ढासळलेल्या दुध दराबाबत युवानेते विक्रम पाचपुते आक्रमक झाले असुन त्यांनी आज श्रीगोंदा तहसिल कार्यालय येथे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून १ ऑगष्ट रोजी दुध दरवाढी संदर्भात आंदोलन छेडत असल्याबाबतचे पत्र तहसिलदार श्रीगोंदा यांना दिले. यावेळी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे कि तालुक्यात मुख्यत: शेतीबरोबर जोड्धंदा म्हणुन पशुपालन व दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते परंतु सद्यस्थीतीत जगावर ओढावलेल्या संकटाने आणि इतर कारणांमुळे दुधाला चांगला दर मिळत नाही यामुळे शेतका-याच्या पदरी काहिच मिळत नाही यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड उदासिनता तयार झालेली असुन ती दुर करण्याच्या उद्देशाने व शेतका-यांना त्यांच्या हक्काचे मिळालेच पाहिजे या हेतुमुळे हे आंदोलन करत आहोत असे सांगितले आहे.
या वेळी युवानेते विक्रमसिंह पाचपुते भाजपा तालुका अध्यक्ष संदिप सर नागवडे किसान मोर्चाचे अध्यक्ष उमेश बोरुडे शहर अध्यक्ष संतोष खेतमाळीस कार्यअध्यक्ष राजेंद्र उकांडे नगरसेवक संतोष क्षिरसागर, सुनिलभाऊ वाळके व सोशल मिडियाचे महेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.