Breaking News

जामखेड शहरातील महिलेचा कोरोनामूळे मृत्यू, तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी !

 जामखेड शहरातील महिलेचा कोरोनामूळे मृत्यू, तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी !
जामखेड प्रतिनिधी
 शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.  तालुक्यातील हा कोरोनाचा चौथा बळी आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
     शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच चालली आहे. आज १०८ जणांची आन्टीजेन रँपीड चाचणी केली त्यात ११ जण कोरोना बाधित आढळले. दोन दिवसात  २२ रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वीच जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महीलेची तब्येत बिघडल्याने तीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तीची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली. मात्र तीच्यावर उपचार सुरू असतानाच तीचा रात्री मृत्यू झाला आसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी दिली. अत्तापर्यंन्त तालुक्यातील मोहरी एक , खर्डा एक व जामखेड येथील दोन अशा एकुण  चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 
नागरिकांनी आतातरी बेफिकीरी सोडावी, विनाकारण घर सोडु नये. रस्त्यावर फिरू नये, गर्दी टाळावी, नियमांचे उल्लंघन करू नये.