Breaking News

राहुरीत उद्यापासून जनता कर्फ्यु सह चार दिवस सम्पूर्ण लॉकडाऊन होणार !


राहुरीत उद्यापासून जनता कर्फ्यु सह चार दिवस सम्पूर्ण लॉकडाऊन होणार !
 
राहुरी/प्रतिनिधी :
राहुरी शहरात दोन दिवसात तीन  तर तालुक्यात नव्याने सात पॉझिटिव्ह रुग्ण अशा दहा रुग्णांची भर पडून दोन दिवसांत दहा रुग्णांची भर पडली आहे , तालुक्यातील पोसॅटिव्ह केसेस 35 झाल्या आहेत . मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर तालुका प्रशासन ,नगरपालिका, व्यापारी असोसिएशन, यांच्यातील चर्चेनंतर उद्या पासून (दि 20 जुलै )तीन दिवस होणार आहे  याशिवाय गुरुवारी  दिनांक 23 जुलै रोजी जनता कर्फ्यू  असल्याने सलग चार दिवस राहुरीतील संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत . 
तालुक्यात 261 पैकी 195 आलेत तर ६० येणे बाकी आहे .
२१ जणांवर उपचार सुरू आहेत तर अन्य सहा बाहेरील नोंदणी झालेले आहेत . नगरपालिका व तालुका प्रशासन आणि पोलिस यांनी लोक डाऊन संदर्भातील बंदोबस्तातील व्यवस्था केली आहे . नागरिकांनी सहकार्य करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.