Breaking News

ते कापड दूकान सुरळीत चालू ,अफवांना विराम !

ते कापड दूकान सुरळीत चालू ,अफवांना विराम !
जामखेड प्रतिनिधी :
शहरातील ते कापड दूकान  नियमांचे पालन करत सुरळीत चालू झाल्याने अफवांना विराम मिळाला आहे. 
प्रशासनाने जामखेड शहरातील एका कापड दूकानातील तपासणी केलेल्या सर्वच (१४) कर्मचारयांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव आल्याने जामखेडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.कर्जत तालुक्यातील कापड खरेदीसाठी दूकान येऊन गेलेल्या एका व्यक्तीची काही दिवसानंतर कोरोना चाचणी पाँझिटीव्ह आली होती. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधार्थ प्रशासनाने माहिती घेत त्या कापड दूकानातील कर्मचाऱ्यांचा संपर्क झाल्याची माहिती मिळताच तातडीने दूकानाशी संपर्क केला दूकान संचालकांनी प्रशासनाला सहकार्य केले. प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविले व त्यांना क्वारंटाईन केले. मात्र त्या १४ जणांचे चाचणी अहवालात निगेटिव्ह आले. ते १४ कर्मचारी क्वारंटाईन मूदतीनंतर कामावर रुजू होत आहेत.
दरम्यान ते कापड दूकान मालकांनी दोन दिवस बंद ठेऊन दूकान पूर्णपणे सँनिटायझिंग करून घेतले आहे. दुकान सुरळीत नियमांचे पालन करत चालू आहे. 
नेहमीप्रमाणेच दूकान येणाऱ्या ग्राहकांचा नोंदी करणे , दारावरच ग्राहकांचे सँनिटायझिंग करणे, दूकानात ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखणे आदी नियमांचे कटाक्षाने लक्ष ठेवून पालन केले जात आहे.