Breaking News

विजबिला संदर्भातील संभ्रम दूर केल्याशिवाय ग्राहकांना विजबिल भरण्यासाठी सक्ती करु नये - सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे

 विजबिला संदर्भातील संभ्रम दूर केल्याशिवाय ग्राहकांना विजबिल भरण्यासाठी सक्ती  करु नये - सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
मागील तीन महिन्यातील लाईट बिले अवास्तव आल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था  आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच नागरिक आर्थिक संकटात सापडले त्यात विजबिले आल्यामुळे नागरिकांवर आधिकचा आर्थिक ताण वाढल्यामुळे  संभ्रम दूर केल्याशिवाय  विज कंपनीने बिले भरण्याचा सक्ती  ग्राहकांकडे करु नये  अशी मागणी  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी विजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
  देशभरात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असुन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नागरिकांना मदत करणे गरजेचे असतांना देखील प्रशासनाकडुन पाहिजे ती  मदत होत नाही सध्याच्या परिस्थितीत ढिसाळ कारभारामुळे वारंवार लाईट जाणे, रोहिञ जळणे, कमी जास्त दाबामुळे विजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहेत.  त्यातच अवास्तव विजबिले आल्यामुळे या रोषात भर पडली आहे.  
ग्राहकांचे शंकानिरसन करणे हे विजवितरण कंपनीची जबाबदारी आहेत. आलेले विजबिल  ग्राहकाने आर्थिक परिस्थितीमुळे भरु न शकल्यामुळे ग्राहकाचे विजतोडणी देखील होवु शकते त्यामुळे विजवितरण कंपनीने ग्राहकाला आलेल्या विजबिलाबाबत संभ्रम दुर करावा. कोणत्याही ग्राहकांवर अन्याय होणार याची दक्षता विजवितरण कंपनीने घ्यावी. तसेच वीजबिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्राहकाला कंपनी कार्यालयात अनेकवेळा येवुन देखील प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्राहक संभ्रमात असुन ग्राहकाला योग्य दिशा देणे हे विजवितरण कंपनीचे काम असुन ते केले जात नाही त्याबरोबर ग्राहकांच्या सेवेसाठी असलेला नंबर देखील असुन नसल्यासारखे आहेत वारंवार फोन करुन ही वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्यामुळे विविध समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे.