Breaking News

तालुक्यातील जातेगाव येथे एक व्यक्ती कोरोना बाधितदिवसभरात तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या चारवर !

तालुक्यातील जातेगाव येथे एक व्यक्ती कोरोना बाधित
दिवसभरात तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या चारवर
पारनेर प्रतिनिधी-  
पारनेर तालुक्यात कोरोना चा संसर्ग वाढत आहे दिवसभरात एकूण कोरोनाची संख्या ही चार वर गेली आहे तालुक्यातील जातेगाव येथे 56 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळला असल्याचे त्याच्या कोरोना चाचणी अहवालावरून निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
दिवसभरात तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ही चार वर गेली आहे यामध्ये हंगे डोंगरवाडी व सुपा येथील कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत
ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे तो 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.