Breaking News

जामखेडकरांनो सावध वागा, बेफिकीरी सोडा !

शिवेबाहेर गेलेले दूखणं  पून्हा वाकुल्या दाखवत आहे.
----------
जामखेड/प्रतिनिधी :
जिल्हय़ातील कोरोना बाधितांच्या यादीमध्ये पुन्हा जामखेडचं नावआल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील मोहरी येथील वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पाँझिटीव्ह आला असल्याने जामखेडकरांनो बेफिकीरी सोडा, सावध वागा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 
नूकताच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या रिपोर्टमध्ये जामखेडला एक रूग्ण आढळयाची नोंद आल्याचे कळले. जामखेडकरांचा ठोका चूकणारी वार्ता वारयासारखी तालुक्यात पसरली आहे. 
सध्या जामखेडकरांचा गाफीलपणे बेफिकीरपणे वावर वाढला आहे. नागरिक व्यावसायिक कोणीही नियम पाळतांना दिसत नाहीत. सध्या प्रशासन ही कारवाईबाबत सूस्ती करतांना दिसत आहे. 
महिनाभरापेक्षा जास्त सर्वांनी त्रास सहन केला. प्रशासनाचे नियम तेव्हा कठोरपणे पाळले. त्यामुळे जामखेड कोरोनामुक्त झाले होते. मात्र, जामखेड करांच्या डोक्यात कोरोनामुक्त झाल्याची हवा गेली अन् मस्त बेफिकीरपणे नागरिक वावरू लागले. लाँकडाऊन मध्येही अर्थिकचक्र सुरळीत राहण्यासाठी शासनाने शिथीलता दिली. याचा अर्थ भीती गेली असं नाही. सध्या बाहेरच्या गावावरून येणारयांची यादी वाढतच आहे. कोणाचा संपर्क कसा अन् कोठे येईल सांगता येत नाही. तेव्हा नागरिकांच्या विनाकारण मूक्त वावराला वेळीच कडक बंधने घालण्याची गरज आहे.