Breaking News

आमदार मेटे यांनी दिली वडुले गावाला सदिच्छा भेट !

आमदार मेटे यांनी दिली वडुले गावाला  सदिच्छा भेट !
वडुले बुद्रुक :
     शेवगाव तालुक्याती वडुले बुद्रुक येथे शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे शेवगाव तालुक्याच्या दौर्यावर आले असताना वडुले बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.श्री मेटे यांनी काळे कुटुंबीयांची विचारपुस  करत  सरपंच काळे यांनी वडुले गावातील केलेल्या विकास कामे पहाता त्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस काळे यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी  शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे जनशक्ती मंचचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे , योगेश काळे ,आप्पासाहेब सागडे, सुहास गर्जे, महेश सगडे, ज्ञानेश्वर जगताप, पांडुरंग हरदास, आदि, कार्यकर्ते उपस्थित होते.