Breaking News

अकोले च्या पश्चिम पट्ट्यातील पेंडशेंत गावातील तरुण मुंबईला जाऊन झाला कोव्हीड पॉझिटीव्ह.


     अकोले च्या पश्चिम पट्ट्यातील पेंडशेंत गावातील तरुण मुंबईला जाऊन झाला कोव्हीड पॉझिटीव्ह. 
  राजूर/प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात  राजूर पासून वरच्या भागात कोरोनाचा एकच रुग्ण गवसला होता तो पण चार दिवसत  ठीक होऊन घरी परतला आदिवासी भाग कोरोना मुक्त अशी ओळख होती पंरतु शेवटी पेंडशेंत गावातील तुकारा वळे ( वय 33) हा तरुण मुंबईला जाऊन कोव्हीड पॉझिटीव्ह झाला आहे. सदर तरुण आठ दिवसांपुर्वी मुंबईतुन पेंडशेंत या आपल्या मुळ गावी आला होता. काही कारणात्सव दोनच दिवसांपूर्वी तो परत मुंबईला गेला. तेथे गेल्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याचे स्वॅब तपासले असता तो कोव्हीड पॉझिटीव्ह निघाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
      सदर तरुण पेंडशेंत गावातील असुन त्याच्या पाठीमागे आई वडील, भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असल्याची माहीती उपलब्ध झाली आहे. हा तरुण पेंडशेंत व भंडारदरा परीसरात कौणकोणत्या ठिकाणी फिरला याची चौकशी होणे गरजेचे आहे. गावातील हा प्रकार गावचे पोलिस पाटील पंढरीनाथ खाडगीर यांनी लाडगाव प्राथमिक केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. फलके यांच्या कानावर सदर प्रकार गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घालुन सुद्धा आरोग्य विभागाचे कोणीही अधिकारी पेंडशेंत गावाकडे फिरकले सुद्धा नसल्याने आरोग्य अधिका-यांना या घटनेचे अजिबात गांभिर्य नसल्याचे लक्षात येते तर महसुल विभागाचा एकही प्रतिनिधी सुद्धा पेंडशेतकडे फिरकला सुद्धा नाही.या सरकारी कर्मचारी वर्गास वेळेत माहिती देऊनही वेळेत आले नाही आदिवासी भागात मास लावणे सुरक्षित अंतर ठेवणे असे नियम पाळले जात नाही कारण ह्या भागात एकही रुग्ण नव्हता सध्या बाहेरून येणार्यांना गावात कोरणटाईन केलं जातं नाही म्हणून हा रुग्ण बिधास्त फिरत होता जर अशीच परिस्थिती राहिली तर आदिवासी भागात गावच्या गाव कोरोना रुग्ण होतील.