Breaking News

निघोज जवळा अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस बंद !

निघोज जवळा अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस बंद 

 पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. 
                        
  निघोज/प्रतिनिधी :
       निघोज व परिसरातील सर्व व्यवहार मंगळवार दि 21 ते गुरुवार दि 23 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार दि 21 रोजी निघोज व परिसरातील वैद्यकीय व्यवसाय व मेडिकलचे दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत . कोरोनाचा संसर्ग जवळच असणाऱ्या जवळा राळेगण सिद्धी वडनेर लोणीमावळा या गावात झाल्याने सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना सुरक्षा समीती, ग्रामपंचायत पदाधिकारी, निघोज ग्रामस्थ व विवीध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला असून कोरोनाचा संसर्ग आपल्या परिसरात होउ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे. गेली चार महिन्यापासून देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुण्ग सापडले आहेत. 
      मुंबई पुणे शहरांमध्ये हे प्रमाण जास्त होते. मात्र गेली पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुण्गांची संख्या जास्त होत गेली आहे. पारनेर तालुक्यातील बहुतांश गावांत गेली आठ दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जवळपासच्या सर्व गावांनी अत्यावश्यक सेवा वगळता तीन ते चार दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउन काळात निघोज येथील सर्व व्यवहार तीन महिने बंद होते. 
     मात्र प्रशासनाने यामध्ये शिथीलता आणल्याने एक महिन्यापासून व्यवहार सुरळीत चालू होते .परंतू शेजारच्या गावांत पेशंट कोरोना पॉझीटीव आढळल्याने निघोज , जवळा ,  तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे .

पिंपळनेरही दोन दिवस बंद  :
   राळेगणसिध्दी येथे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे पिंपळनेरही दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे .कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्क व सॅने टायजर वापरावे व कामाशिवाय घराबाहेर पडु नये असे पिंपळनेर ग्रामपंचायत, कोरोना सुरक्षा समितीने सांगीतले आहे