Breaking News

कु. निशिगंधा हिंगडे श्री हरेश्वर विद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम !

 कु. निशिगंधा हिंगडे श्री हरेश्वर विद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम  !
टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
   उच्च माध्यमिक विभागाचा निकाल बोर्डा कडून जाहीर झाला आहे. श्री हरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 12 वी वाणिज्य शाखेचा निकाल पुढील प्रमाणे, 12 वी च्या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण  53 मुले प्रविष्ट झाले होते, 49 मुले उत्तीर्ण झाली व 4 मुले नापास झाली असून विद्यालयाचा शेकडा निकाल 92.30% लागला आहे.
  विद्यालयात आज गुणवंत आजी व माजी  विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम covid 19 च्या सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आला होता, अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच  साहेबराव वाफारे होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे खजिनदार एस डी आंधळे सर ,संचालक भगवंत आंधळे, संचालक बबनराव शिर्के, संचालक भास्कर उंडे, रामदास आंधळे, व मुख्याध्यापक उंडे सर उपस्थित होते. या वेळी स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा पण संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात  महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून  उपनिरीक्षक (excise sub inspector) म्हणून निवड झालेला विद्यार्थी कुमार आवटे सौरभ सुभाष, तसेच देश पातळीवरील बँक सेवा परीक्षे राज्यात पहिली आलेली व बँक ऑफ इंडिया मध्ये विशेष पदावर निवड झालेली विद्यालयाची विद्यर्थिनी कु आंधळे मनाली संजय, तसेच 12 वी वाणिज्य शाखेतून विद्यालयात पहिली आलेली विद्यर्थिनी कु हिंगडे निशिगंधा विष्णू, आणि 12 वी च्या परीक्षेत द्वितीय आलेली विद्यर्थिनी कु पठाण अंजुम युसूफ आणि विद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि रेसिडेंशील विद्यालयात विज्ञान शाखेत 92 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी कुमार उंडे अभिषेक बाळासाहेब, या सर्वांचा शिक्षक, पालक व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
   परिसरातून या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शाळेचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास शिंदे, उपाध्यक्ष सुदामशेठ जाधव, सचिव  शिवाजी आंधळे, यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले,

श्री हरेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कर्जुले हर्या ता. पारनेर या विद्यालयाचा सन फेब्रुवारी / मार्च 2020 मधील निकाल
शेकडा - 92.30℅
एकूण बसलेले विद्यार्थी-53
उत्तीर्ण विद्यार्थी -49
अणुउत्तीर्ण विद्यार्थी -04

प्रथम पाच विद्यार्थी 
अनुक्रमे

1] हिंगडे निशिगंधा विष्णू.                                                                          552 एकूण गुण 
    84.92℅

2] पठाण अंजुम युसूफ                                
  505 एकूण गुण
    77.69℅

3] लांडगे अनिकेत खंडू.      
       492 एकूण गुण
      75.69 %

4] शिंदे निलम उत्तम                    
      477 एकूण गुण
      73.38℅

5] उंडे काजल प्रकाश
     453 एकूण गुण
      69.69℅

 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मधुकर बर्वे सर यांनी केले.