Breaking News

तुमच्या कुटुंबाची काळजी करू नका कुठलीही अडचण आली तर मला सांगा : आमदार निलेश लंके

तुमच्या कुटुंबाची काळजी करू नका कुठलीही अडचण आली तर मला सांगा-आ निलेश लंके

मालेगाव पॅटर्नप्रमाणे डॉ. उज्ज्वल कापडणीस यांचा पारनेरमध्ये योगा शुभारंभ 

  आमदार निलेश लंके यांनी कोविड रुग्णालयात जाऊन  रुग्णांची केली विचारपूस 

आमदार निलेश लंके यांनी कोरोना बाधित रुग्णांना दिला मानसिक आधार

पारनेर/प्रतिनिधी : 
 पारनेर येथे ग्रामीण रुग्णालयांमध्ये 40 खाटा सह ऑक्सिजन व्यवस्था  असलेले हॉस्पिटल तयार करण्यात आले त्यामध्ये कोविड रुग्णांसाठी मालेगाव पॅटर्नप्रमाणे डाॅक्टर उज्वल कापडणिस यांचा ओम शांतीवर आधारित  म्युझिकल योगा व राजयोग मेडिटेशन वर्ग याचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडला
   पारनेर येथे कोविड हॉस्पिटलमध्ये 18 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत पारनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचे तालुक्यातच उपचार व्हावे व त्यांना येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून पारनेर येथील खाजगी डॉक्टर यांच्या मदतीने या हॉस्पिटलमध्ये बेड व अद्यावत सेवांची उपलब्धता करण्यात आली या हॉस्पिटलला आमदार लंके यांनी भेट दिली या हॉस्पिटलची पाहणी केली येथील  रुग्णांची पी.पी.इ. किट घालून व सर्व सुरक्षितता पाळून भेट घेतली त्यांना मानसिक आधार दिला यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ हे माझे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातील एकाही रुग्णांची हाल होणार नाही.व कुणालाही कोरोना सारख्या विषाणूचा फटका बसणार नाही. यासाठी मी व सर्व प्रशासन जबाबदारीने काम करीत आहोत. याठिकाणी सर्व रूग्णांना दर्जेदार सुविधा मिळतील. असे ते म्हणाले यावेळी योग प्रशिक्षक राजराजेश्वरी कोठावळे यांनी योग वर्गाचे संचालन केले यावेळी आमदार निलेश लंके यांनी पी. पी. इ. किट घालून योगा केला.

 रुग्णांना या ठिकाणी दूध अंडी गरम पाणी हळदीचे  पाणी याचे नियोजन व सुविधा शिवभोजन थाळी चे श्री लोंढे यांच्या मार्फत करण्यात आले आहे 
येथे गरम वाप तसेच रुग्णांची नियमित तपासणी सुविधा करण्यात आली आहे शासकीय असूनही प्रायव्हेट प्रमाणे रुग्णाची काळजी घेतली जात आहे यावेळी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, गटविकास अधिकारी किशोर माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, डॉ. मनिषा उंद्रे,डॉ सतीश लोंढे डॉ.सुदाम बागल, असोसिएशनचे डॉ अजित लंके डॉ.संदीप औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ खिलारी डॉ. प्रदीप पुजारी, डॉ. नरेंद्र मुळे योगा प्रशिक्षक राजराजेश्वरी कोठावळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, आरोग्यअधिकारी आदी उपस्थित होते.
-------------------------------------
      संकटाला संधी म्हणून पहा घाबरून जाऊ नका व्यवस्थित काळजी घ्या तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहेत पारनेर मधील हि राज्यातील पहिलीच घटना असेल की सरकारी डॉक्टरांच्या बरोबरच खाजगी डॉक्टर हेही तेवढेच खांद्याला खांदा लावून काम करतात सर्व तुमच्या सेवेसाठी आहेत तुम्ही कुठली काळजी करू नका तुमच्या कुटुंबाची काळजी करू नका कुठलीही अडचण आली तर मला सांगा ती दूर करण्यात येईल असे कोविड रुग्णांना आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

    शारीरिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्य दोन्ही आघाड्यावर हे आरोग्य केंद्र काम करणार आहे येथे रुग्णांची व्यवस्थित सेवा घेतली जात आहे त्यांना म्युझिकल योगा च्या माध्यमातून तणावातून मुक्तता मिळेल त्यासाठी हा योगा दररोज येथे घेण्यात येणार आहेत. असे तहसीलदार ज्योती देवरे  यांनी सांगितले.