Breaking News

पारनेर तालुक्यात राळेगण थेरपाळ ३ व्यक्ती कोरोना बाधित, तालुक्यात दिवसभरात एकूण चार कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात  राळेगण थेरपाळ ३ व्यक्ती कोरोना बाधित, तालुक्यात दिवसभरात एकूण चार कोरोना बाधित !
--------
एकाच कुटुंबातील तिघांना कोरोना ची बाधा झाली आहे.
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यात दि २६ रोजी प्राप्त झालेल्या खाजगी लॅब च्या अहवालानुसार राळेगण थेरपाळ येथील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोना ची बाधा झाली आहे राळेगण थेरपाळ येथील बाधित आढळले तिघे हे स्थानिक रहिवासी आहेत  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
दि.२६ रोजीचा आत्तापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा चार वर गेला आहे. सकाळी धोत्रे येथील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळली होती
पारनेर तालुक्यातील आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०० पार गेली आहे,कोरोना बाधित रुग्णांचा तालुक्यातील वाढता आलेख हा चिंतेचा विषय होत आहे.
 कोरोना बाधित व्यक्ती आढळलेल्या शंभर मीटर परिसरात  कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे असे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.