Breaking News

कोपरगाव शेतकरी अन्नदात्याला न्याय द्या -- मनसे

कोपरगाव शेतकरी अन्नदात्याला न्याय द्या -- मनसे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव नगरपालिकेने शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी  नेहरू भाजी मार्केट आणि बाजारतळ या ठिकाणी रोघोजी भांगरे भाजी मार्केट तयार करुन दिले.परंतु हि जागा अपुरी पडत आहे.त्यामध्ये जागेच्या कारणावरून आपाअपसात भांडणे होतात.तसेच कृषी उत्पन्न बाजारसमितिने बैल बाजार या ठिकाणी अनेक वर्षापासून  व्यवस्था केली आहे.परंतु या ठिकाणी जनावरांच्या बाजारामुळे येथे शेण घाण डास मच्छर होत आहे.यामुळे भाजीपाल्यावर माशा मच्छर बसतात.या कारणांमुळे  भाजीपाला खरेदी करण्यास येणाऱ्या  महिला भाजीपाला खरेदी साठी नापसंती दर्शवितात.मुतारी आणि डासांमुळे येथील शेतकऱ्यांना  रोगराईचा सामना करावा लागत आहे.त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.शेतकर्यांना व्यवस्थित. बसण्यासाठी जागा नसून जनावरे बांधतात तेथे त्यांना जागा देण्यात आली आहे.येथे साफसफाई करुन तेथील काटे काढावे.त्यांना ओटे बांधून द्यावे.जेणे करुन रस्त्यावरील व्यक्ती बाजार भाजीपाला घेवुन जावु शकतो.शेतकरी बांधवासाठी लवकरात लवकर स्वच्छता करुन त्यांना बसण्याची जागा व्यवस्थित करुन द्यावी.यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल.यासंदर्भात नुकतेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर सतिष काकडे शहराध्यक्ष अलिम शहा ता.अध्यक्ष अनिल गाडे विजय सुपेकर रघुनाथ मोहिते बंटी सपकाळ नितिन त्रिभुवन जावेदभाई शेख सचिन खैरे आनंद परदेशी सागर महापूरे नवनाथ मोहिते बापू काकडे यांच्या सह्या आहेत