Breaking News

कम्युनिटी किचनचे फूड पाकीट अखेर पोहोचले श्रमिकनगर मध्ये -माजी नगरसेविका सौ वीणाताई बोज्जा यांच्या प्रयत्नांना यश !

कम्युनिटी किचनचे फूड पाकीट अखेर पोहोचले श्रमिकनगर मध्ये -माजी नगरसेविका सौ वीणाताई बोज्जा यांच्या प्रयत्नांना यश 

 दानशूर व्यक्तींनी कम्युनिटी किचनला आर्थिक अगर वस्तूरूपाने मदत करावी.
नगर/प्रतिनिधी :
 श्रमिकनगर भागांत  लॉकडाऊन केल्यामुळे येथील नागरिकांचे  खाण्यापिण्याची हाल होऊ नये तसेच आरोग्याची व्यवस्था व्हावी  याकरिता प्रशासनाने कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी व फिरते दवाखाना या ठिकाणी उभे करावे अशी मागणी माजी नगरसेविका सौ विणाताई  बोज्जा  यांनी मा.आयुक्त,  महानगरपालिका व मा. जिल्हाधिकारी,  अहमदनगर  यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केले  होते. या निवेदनाचे  प्रशासनाने गांभीर्याने विचार करून या भागात त्वरित  फूड पाकिटाचे वाटप करण्यात आले. यासाठी महानगरपालिकेचे यंत्र अभियंता परिमल निकम यांनी पुढाकार घेतले या मुळे त्यांचे अभिनंदन. 
 आता फिरते दवाखान्या साठी  प्रयत्न
   या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता लॉक डाऊन मुळे या परिसरातील सर्व दवाखाने बंद असून या भागात  अहमदनगर महानगरपालिकेचे फिरते दवाखाना  उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना औषधोपचार घेणे सोयीचे व्हावे  याकरिता  मा.आयुक्त तसेच आरोग्याधिकारी श्री बोरगे यांच्याशी फोनवर चर्चा करूनही  त्यांनी फिरते दवाखान्याची व्यवस्था अद्याप केली नाही म्हूणन मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी फोन वर चर्चा केली असता त्यांनी  या बाबत  संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले परंतु काल दिवसभरात मा. आयुक्त व मा. आरोग्याधिकारी यांचे बरेच वेळा फोन स्विचऑफ आढळून आले ही बाब गंभीर आहे. 
    अशा परिस्थितीत प्रशासन सतर्क राहणे गरजेचे आहे   श्रमिकनगर  भागातील परिस्थिती चा गांभीर्याने विचार होणे  गरजेचे असून या भागात दोन ते अडीच हजार नागरिक लहान मुले राहत असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार  करून लवकरात लवकर या भागात  फिरते दवाखान्याची व्यवस्था करावी. तसेच कम्युनिटी किचन हे लोकसहभागातुन चालवीत असल्यामुळे या करिता आर्थिक तसेच किराणा स्वरूपात दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे  आवाहन माजी नगरसेविका सौ वीणाताई बोज्जा यांनी केली आहे.