Breaking News

कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाची दहावी निकालाची परंपरा कायम !

कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाची दहावी निकालाची परंपरा कायम !
करंजी विद्यालयाचा निकाल ९५.८३ टक्के 
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
  कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर शंकररावजी काळे 
माध्यमिक विद्यालय ,करंजी बुद्रुक या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा मार्च २०२० चा निकाल शेकडा ९५.८३ टक्के  इतका लागला. 
विद्यालयात एकूण २९ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. २६ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त झाले. १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले.
 रितेश भाऊसाहेब आगवन व कुमारी साक्षी अण्णासाहेब कापसे हे दोन विद्यार्थी ९१.६० टक्के   गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.  कुमारी साक्षी दत्तात्रय भिंगारे ९०.६० टक्के  घेऊन विद्यालयात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कुमारी अश्विनी अनिल चरमळ ही विद्यार्थिनी ८९.२० टक्के  गुण घेऊन विद्यालयात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सर्व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. आमदार आशुतोषजी काळे साहेब ,  रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य तथा विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन मा.कारभारी पाटील आगवन, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ विमलताई कारभारी आगवन, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा. डॉ. सुनीलजी देसाई, सांडू भाई  पठाण,  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय कारभारी आगवण,  रयत लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन माननीय मुकुंद आगवन व करंजी पंचक्रोशीतील सर्व  स ग्रामस्थांनी केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय दिनकर महिपत माळी,  सौ अनाप ए. एम., श्री चौधरी बी बी,श्री सांगळे जी.डी.,श्री जगताप एल.पी. ,   चव्हाण एस. डी.श्री वसावे व्ही.  आर.श्री सरोदे ए. व्ही.व श्री  डोखे  जी.एस.  या सर्वांचे मार्गदर्शन लाभले