Breaking News

निघोज येथे तिरट खेळताना सात जुगारी पोलिसांच्या ताब्यात !

निघोज येथे तिरट खेळताना सात जुगारी पोलिसांच्या ताब्यात
पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील निघोज इथे तिरट नावाचा जुगार खेळताना सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार हजार रुपये जप्त करण्यात आले आहे यात अनेक प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महादेव पांडुरंग गायकवाड वय 53 वर्ष रा. निघोज ता पारनेर जि अहमदनगर                           
कुंडलिक जानकु लामखडे वय 30 वर्ष रा. निघोज डोंगर मळा ता पारनेर जि अहमदनगर सुदाम गीताराम धवन वय 30 वर्ष रा. ढवन वाडी ता पारनेर दीपक तुकाराम भोसले वय 42 वर्ष रा. निघोज ता पारनेर  राजू माळीभाऊ लामखडे 45 वर्ष रा निघोज जवळा ता पारनेर भाऊसाहेब दशरथ दुबगुले  वय 48 वर्षे रा. निघोज ता पारनेर बाळू मुंजाबा झुंझुलके वय 58 रा. निघोज कुंड रोड ता पारनेर हे आरोपी एक महादेव पांडुरंग गायकवाड याचे राहते घराचे आडोशाला निघोज गावात तालुका पारनेर मा. जिल्हा अधिकारी सो अहमदनगर यांनी त्यांच्याकडील कार्यालयीन आदेश क्रमांक क्र. डी. सी / 9 ब 1/1046 / 2020 अहमदनगर दि 30 जून रोजी अन्वये जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मास्क न लावता एकत्रित जमाव करून सोशल डिस्टंसिंग पालन न करता तिरट नावाचा हार जित चा जुगार खेळत असताना मिळून आले आहे त्याच्याकडून 4060 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.पो.कॉ. रविंद्र पांडुरंग पाचारणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे व पो. ना.एस व्ही गुजर करत आहेत.