Breaking News

पारनेर तालुक्यात पुन्हा दोन कोरोना बाधित, आज तालुक्यातील कोरोना बाधित चा आकडा पाच वर !

पारनेर तालुक्यात पुन्हा दोन कोरोना बाधित !
आज तालुक्यातील कोरोना बाधित चा आकडा पाच वर
पारनेर प्रतिनिधी- 
 पारनेर तालुक्यात पाडळी दर्या येथील 47 वर्षीय व दैठणे गुंजाळ येथील 60 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे त्यांच्या अहवालानुसार निष्पन्न झाले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
  तालुक्यात दि 25 रोजी 5 बाधित आढळले आहे यात सकाळी आलेल्या अहवालानुसार सुपा दोन व भाळवणी येथील एक व्यक्तीचा समावेश आहे
तर गारखिंडी चार सोबलेवाडी एक माळ खूप दोन सुपा सहा दैठणे गुंजाळ 1 असे एकूण पंधरा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.
बाधित रुग्ण आढळले आहे ते  गावे तीन दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत तसेच  बाधित व्यक्ती राहत असलेला 100 मीटर परिसर कंटेनमेंट दोन घोषित करण्यात आला आहे.