Breaking News

अकोले बंद करून जनतेला वेठीस धरू नका दलितमित्र प्रकाश साळवे !

अकोले बंद करून जनतेला वेठीस धरू नका  दलीतमित्र प्रकाश साळवे.

लग्नातील वऱ्हाडीचं काय ?
अकोले प्रतिनिधी : 
अकोले तालुक्यातील काळेवाडीत तो शाही विवाह पार पडला त्यात नवरी करोना बाधित निघाल्यावर ही त्या लग्नाला उपस्थितीत वऱ्हाडी आजही तालुक्यात फिरत असून त्यामुळे तालुकाच धोक्यात आला असताना प्रशासन मात्र कारवाई साठी कुणाच्या दडपणाखाली आहे ? नुसते अकोले बंद करून चालणार नाही तर काळेवाडी सारखे प्रकरणाना पाठीशी घालू नये असे दलितमित्र प्रकाश साळवे यांनी म्हटले आहे.
     श्री.साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,अकोले बंद करून जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार कोरोनाच्या नावाखाली होत आहेत.अकोले शहरातील काही धनिक व धनदांडगे व्यापारी कोरोणाच्या नावाने अकोले शहर विनाकारण बंद ठेवत आहेत. अकोले बंद ठेवण्यासाठी काही  लोक हाताशी धरून सर्व सामान्य जनेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.वास्तविक अकोल्यातील या व्यापारी लोकांना व अकोले नगरपंचायत ला शहर बंद ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही . तहसीलदार यांनी या कामी मध्यस्थी करणे गरजेचे आहे.अकोले तालुक्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी त्यांचा थेट संपर्क अकोले शहराशी नाही व अश्या ठिकाणी कंटेंनमेंट झोन जाहीर करण्याचे अधिकार तहसीलदार यांना असतात मात्र अकोले शहरात दोनचार लोक एकत्र येऊन   अकोले शहरात कोरोनाची भीती सर्वसामान्य जनतेत पसरवत आहेत.
जेथे कोरोणाचे रुग्ण सापडत आहेत तेथे प्रशासन योग्य ती कार्यवाही करत आहेत.अकोले शहरातील रुग्ण असलेल्या ठिकाणी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली आहे. मात्र त्यासाठी इतर ठिकाणच्या लोकांना नाहक त्रास दिला जात आहे.
अकोले बंद असल्याने सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नाही त्यामुळे गोरगरीब व मजुरी करणारे लोक यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. ज्यांच्यावर कारवाई करायची ते मात्र ते लोक बाजूलाच आहे.
शहरातील काही मोठे लोक छुप्या मार्गाने आपले व्यवसाय करत आहेत तर छोट्या मोठ्या दुकानदारांना याचा फटका बसत आहेत.मग हे बंदचे नाटक करुन काय फायदा असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अकोले बंद करण्याची घोषणा करण्यापुर्वी जनतेला जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कोणताही वेळ दिला नाही. त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे या पाश्र्वभूमीवर अकोले प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा.असेही साळवे यांनी म्हटले आहे
---------