Breaking News

कोरोनाच्या प्रर्श्वभूमीवर ओतूर येथील श्रावणी सोमवार यात्रा रद्द !

कोरोनाच्या प्रर्श्वभूमीवर ओतूर येथील श्रावणी सोमवार यात्रा रद्द !

( श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचा निर्णय )

ओतूर,प्रतिनीधी : 
कोरोना विषाणुच्या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातले असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.कोरोनाने शहराबरोबर ग्रामीत भागातही शिरकाव केला आहे.यामुळे शासनाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी संचारबंदी केली असून कलम १४४ लागू केले आहे तर ग्रामीण भागातील गावे कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे कंन्टेन्मेंट झोन,बफर झोन म्हणुन जाहिर केली आहेत.कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवार यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली असल्याचे श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी माहिती देताना सांगीतले.

ओतूर येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवार यात्रा दरवर्षी श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी भरते.कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार होणाऱ्या कलात्मक तांदळाच्या पिंडी पहाण्यासाठी व दर्शनासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन भाविक मोठ्या संख्येने ओतूरमध्ये दाखल होतात. श्रावण महिण्यातील पहिल्या सोमवारी शालेय विद्यार्थ्यांंच्या दिंडी स्पर्धा,दुसऱ्या सोमवारी संगीत भजन स्पर्धा,तिसऱ्या व चोथ्या सोमवारी कुस्त्यांचा जंगी अखाडा तसेच मंगळवारी शिळा हंगाम्या निमित्तही कुस्त्यांचा अखाडा भरतो व नंतर रूद्राभिषेक व महाप्रसादाने यात्रेची सांगता होते.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यात्रा होणार नसुन रूढी परंपरेनुसार मंदिरात शिवलिंगावर तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येणार आहेत.तसेच पुजाअर्चा करून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव वसंत पानसरे व महेंद्र ( गांधी ) पानसरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगीतले.त्यामुळे मंदिर परिसरात कुणीही येवू नये,तसेच गर्दि करू नये असे देव-धर्म संस्थेच्या वतीने सर्व भाविकांना कळविण्यात आले आहे.

[ राज्य शासनाच्या आदेशान्वये कोवीड १९ मुळे ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवार यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच जमावबंदी असुन कलम १४४ लागू असल्याने नागरिकांनी कोवीड १९ च्या पार्श्वभुमिवर शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल ! ]
--------- 
परशुराम कांबळे

सहाय्यक पोलिस निरिक्षक,ओतूर पोलिस स्टेशन ]