Breaking News

कोपरगाव मध्ये कोरोनात वाढ !

कोपरगाव मध्ये कोरोनात वाढ !

करंजी प्रतिनिधी- 
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात नातलगाच्या लग्न समारंभासाठी जाऊन आलेला कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील ६० वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आला आहे.
   तसेच कोपरगाव शहरातील गाजबलेल्या वस्तीतील विवेकानंद  परिसरातील नामवंत ६२ वर्षीय घसा तज्ञ पुरुष डॉक्टर कोरोना बाधित आढळून आला आहे अशी माहिती कोपरगाव ग्रामीण चे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
    आज अखेर कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या बघता शहरामध्ये २ महिन्यांपूर्वी कोरोना मुळे एक महिला मृत्यू पावली होती,त्यात  आज अखेर तालुक्यातील १२ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहे तसेच आता सध्या कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या एकूण १९ झाली असल्याने शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना नावाची घबराट पसरली असून नागरिकांनी स्वतःची व कुटूंबाची काळजी घेत प्रशासनाचे नियम पाळत लग्न समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे होऊन बसले आहे.