Breaking News

श्रीगोंदा पंचायत समितीचा कर्मचारीच कोरोना पॉझिटीव्ह श्रीगोंदा तालुक्यात नव्याने ५ जण पॉझिटीव्ह

श्रीगोंदा पंचायत समितीचा कर्मचारीच कोरोना पॉझिटीव्ह श्रीगोंदा तालुक्यात नव्याने 5 जण पॉझिटीव्ह   
    श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी : 
      श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाची बाधा वाढतच आहे. नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार 5 जण पॉझिटीव्ह आले असून या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर घारगाव 1, गार 2, अजनुज 1 असे इतर पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह आकडा आता 42 वर गेला आहे. त्यातील 22 रुग्ण ठणठणीत झाले असले तरी 15 जण उपचार घेत असून असता या पाच जणांची नव्याने भर पडली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पंचायत समितीचे एक कर्मचारी नगरला आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले आणि कोरोना सोबत घेऊन आले. भीमा नदीकाठच्या गावांना दौंडचा धोका वाढतोय. गार मधील पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या घरातील दोन जण पॉझिटीव्ह आले यात 5 वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. तर अजनुज येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. 
       तेथील एक पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. घारगाव येथे पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या घरातील व्यक्ती पॉझिटीव्ह आलेला आहे. या सगळ्या गोंधळात आता श्रीगोंदयाचा कोरोना पॉझिटीव्ह आकडा 42 वर गेला आहे. नगर, दौंड, पुणे, मुंबई या सारख्या शहरात जाण्याचे टाळावे असे आवाहन डॉ. खामकर यांनी केले आहे.