Breaking News

माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांना पितृशोक, जामखेड कर्जत मतदारसंघात शोककळा

जामखेड/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे  यांचे वडील स्व.शंकर बाप्पू शिंदे  (वय ८०) यांचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. 
जामखेड तालुक्यातील चौंडी गावात जन्म घेतला. वयाच्या ६० वर्षेपर्यंत हळगाव चौंडी पंचक्रोशीत सालकरी म्हणून काम केले. 

एक प्रामाणिक शेतमजूर, सालकरी, ते कँबिनेट मंत्र्याचे वडील म्हणून  नाव मिळवले. मूलगा मंत्री झाला तरी कै शंकर शिंदे यांनी स्वतः मध्ये कोणताही बडेजाव ठेवला नाही. एक सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाला आपुलकीने वागणूक दिली. 
कै. शंकर शिंदे यांच्या निधनाची वार्ता कळताच जामखेड- कर्जत मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मूलगा माजी मंत्री प्रा.राम शिंदे, चार मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.
कै शंकर शिंदे यांचा अंत्यविधी रविवार दि ५ रोजी सकाळी ९ वा मूळगाव चौंडी येथे होणार आहे.