Breaking News

विरगाव येथे आढळला कोरोना पॉजिटीव्ह !

विरगाव येथे आढळला कोरोना पॉजिटीव्ह !
गणोरे प्रतिनिधी :- 
       आज सकाळी गणोरे येथील स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार विरगाव येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाचा तपासणी अहवाल रात्री उशिरा मिळून आला.
         सादर रुग्णाने गणोरे येथे उपचार घेतल्याचे स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या लक्षात आल्याने गणोरे येथील एक खाजगी दवाखाना सील करण्यात आला असून तेथील डॉक्टर व कर्मचारी यांना होम कॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती स्थानिक कोरोना समितीने दिली आहे.
       तसेच सर्व नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेले सर्व मार्गदर्शक सूचना यांचे पालन करावे असे सूचित करण्यात आले आहे. सर्वांनी काळजी घ्या. विनाकारण बाहेर पडू नका. घरी रहा सुरक्षित रहा. 
       गणोरे येथे रुग्णाने तपासणी करण्यात आल्याचे लक्षात आल्याने स्थनिक कोरोना समितीने गावात फिरून मास्क वापरण्याचे आदेश दिलेत.मास्क न वाप्रणाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.