Breaking News

वैद्यकीय यंत्रणा आणि कोरोना कमिटीतील समन्वयाच्या अभावाने गोंधळाची स्थिती--सुनिल मुथा

वैद्यकीय यंत्रणा आणि कोरोना कमिटीतील समन्वयाच्या अभावाने गोंधळाची स्थिती--सुनिल मुथा
        बेलापूर : - ( प्रतिनिधी ) 
वैद्यकीय यंत्रणा आणि कोरोना कमिटीतील समन्वयाच्या अभावाने गावात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप टॕक्सी युनियनचे अध्यक्ष सुनिल मुथा यांनी केला आहे.
        बाधीत व्यक्ती गावभर फिरल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी , कोरोना कमिटी , स्थानिक पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मिटिंगमध्ये ते बोलत होते. निगेटिव्ह-पॉझिटिव्हच्या खेळात संशयीत व्यक्ती गावभर फिरला ! यास वैद्यकीय यंत्रणेचा बेजवाबदारपणा कारणीभूत असल्याचे सांगून , रिपोर्ट यायला उशीर का होईना , पण सदर व्यक्तीस होमक्वारंंटाईनचा शिक्का मारून बेलापूर आरोग्य केंद्रास कळविले असते तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जवाबदारी निश्चित झाली असती. त्याचप्रमाणे सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याचे काम गावातील कोरोना कमिटीचे आहे. असे सांगून गुळमिळीत धोरण बाळगणाऱ्या कमिटी सदस्यांचीही त्यांनी सडकून कानउघडणी केली. विना मास्क फिरणाऱ्या निष्काळजी लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थित  पोलीस प्रशासनाकडे त्यांनी केली. गावातील तिसऱ्या बाधीत रुग्णाच्या नात्यातील चौदा व्यक्तींना स्वॕब न घेता , होमक्वारंंटाईनचा शिक्का न मारता , संबंधीत कोरोना कमिटीला न कळवता घरी वापस पाठविले या बद्दल पत्रकार देविदास देसाई यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. कुणाचाच कुणाशी मेळ नसल्याने रात्री सील केलेल्या बाधीत भागातील नागरिक सकाळीच गावातील चौकात हजर असल्याचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी सांगितले. त्याचबरोबर सुधाकर खंडागळे , प्रफुल्ल डावरे , अशोक पवार , प्रसाद खरात , ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नाईक , वाघ आदींनी सुचना मांडल्या .
         यापुढे तालुका वैद्यकीय यंत्रणा , कोरोना कमिटी , स्थानिक पोलीस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र आदींशी समन्वय साधून या कोरोना संकटाचा सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
          यावेळी टॕक्सी युनियनचे अध्यक्ष सुनिल मुथा , झेडपी सदस्य शरद नवले , कृउबा समिती सदस्य सुधीर नवले , उपसरपंच रविंद्र खटोड , माजी सरपंच भरत साळुंके , अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे , पो.ना.रामेश्वर ढोकणे , पो.कॉ.राशिनकर , पो.पा.अशोक प्रधान ,कामगार तलाठी खाडे ,  पत्रकार देविदास देसाई , नवनाथ कुताळ , विष्णूपंत डावरे , प्रा.ज्ञानेश गवले , सुहास शेलार , अशोक शेलार , दीपक क्षत्रिय ,  डॉ.मोरे , डॉ.शैलेश पवार , विजय शेलार , सुधाकर खंडागळे , अशोक गवते , चंद्रकांत नाईक , प्रसाद खरात , अजय डाकले , प्रफुल्ल डावरे , राजू कुताळ आदी उपस्थित होते.