Breaking News

घुमटवाडी गावातील ग्रामस्थ अंधारात;शिवेसना शहर प्रमुख सागर राठोड यांचा आंदोलनाचा इशारा !


घुमटवाडी गावातील ग्रामस्थ अंधारात;शिवेसना शहर प्रमुख सागर राठोड यांचा आंदोलनाचा इशारा !
पाथर्डी/प्रतिनिधी :
    मागील ७ दिवसापासून घुमटवाडी गावातील ट्रान्सफॉर्मर (डी पी) जळाल्यामुळे गावात वीज नाही. त्यामुळे संपूर्ण गाव अंधाराखाली आहे.सध्या कोरोना माहामारी मध्ये नागरीकांना अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.तसेच अनेकांचा हाताला काम नाही त्यात ७ दिवसांपासुन वीज  नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.पीठाची गिरण बंद आहे,अनेक गांवाचे रस्ते बंद आहे,कोरोनामुळे शेजारच्या गावातील पीठगिरणीवर येण्यास मज्जाव करत आहे.यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे.
      तरी सदरील विजेचा प्रश्नाची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख सागर राठोड यांनी
पाथर्डीचे कार्यकारी अभियंता निलेश मोरे व साहाय्यक अभियंता जाधव यांनी केली आहे.
    यावेळी माणिकदौंडी विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख विलास राठोड,विजय चव्हाण, प्रविण चव्हाण,निलेश चव्हाण,योगेश राठोड आदी जण उपस्थित होते.