Breaking News

अमिताभ, अभिषेक यांचे रिपोर्ट निगेटिव्ह! लवकरच मिळणार डिस्चार्ज!

अमिताभ, अभिषेक यांचे रिपोर्ट निगेटिव्ह! लवकरच मिळणार डिस्चार्ज!

- ऐश्वर्या, आराध्या बच्चनवर उपचार सुरु
- अमिताभ यांनी मानले देशवासीयांचे आभार
मुंबई/प्रतिनिधी
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता बिगबींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ११ जूनपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, त्यांचे पुत्र अभिषेक यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लवकरच या बाप-लेकांना डिस्चार्ज दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
तसेच कोरोना चाचणी व्यतिरिक्त अमिताभ यांची ब्लड टेस्ट आणि सीटी स्कॅनही करण्यात आले होते. त्यांचे इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. बिग बींचा मुलगा अभिषेक बच्चनचेही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे या दोघा बाप-लेकांना मुंबईतील विले पार्ले येथे असलेल्या नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ७७ वर्षीय बिग बी आणि ४४ वर्षीय अभिषेक यांच्याव्यतिरिक्त ऐश्वर्या राय-बच्चन (४६) आणि आराध्या (८) यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावरही नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी चौघांचीही पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली होती. यामधून ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नव्हता.