Breaking News

जे. टी. एस. विद्या संकुलात बारावी परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम !

जे.टी. एस. विद्या संकुलात बारावी परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम !
 बेलापूर/प्रतिनिधी :
येथील बेलापूर शिक्षण संस्थेच्या जे. टी. एस. विद्या संकुलातील कनिष्ठ महाविद्यालय विभागाने उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
विविध विभागांचा शाखानिहाय निकाल- विज्ञान शाखा -98.68 टक्के, वाणिज्य शाखा-96.25,कला शाखा-60.58,व्यवसाय शिक्षण शाखा-83.50 याप्रमाणे आहे.

विज्ञान शाखेत- कु. श्रुष्टी बाबासाहेब थोरात(90.15)प्रथम,कु. पूनम किसन सालबंदे(81.69)द्वितीय, व कु. गौरी अनिल थोरात(80.00)तृतीय आली.

वाणिज्य शाखेत -कु. विद्या सीताराम जाधव(85.23)प्रथम,कु. हर्षदा जगन्नाथ सदाफुले(84.61)द्वितीय व कु. वैष्णवी अनिल जोशी(83.85)तृतीय आली.

कला शाखेत-कु. निलेशा अण्णा मुंजाळ(89.38)प्रथम, कु.सुवर्णा गोविंद राशीनकर(75.69)द्वितीय व कु.सुयशा अशोक नागले(75.54)तृतीय आली.

व्यवसाय शिक्षण शाखेत-गणेश भुजंग बडे (71.84)प्रथम,गणेश संजय महाडिक (70.00)द्वितीय व कु. प्रियंका संजय बडधे (68.46) तृतीय आली.
 
या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, सचिव अँड. शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची,खजिनदार हरिनारायण खटोड,जे. टी. एस.हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष बापुसाहेब पुजारी, ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद खटोड,एम. सी. व्ही. सी. विभागाच्या अध्यक्षा श्रीमती लीलावती डावरे, सिनियर कॉलेजचे अध्यक्ष राजेश खटोड,कॉलेज प्रतिनिधी संचालक माजी सरपंच भरत साळुंके, एस. आर. के. प्राथमिक विद्यालय अध्यक्ष रविंद्र खटोड,विश्वस्त हरिश्चंद्र महाडिक,मधुकर दराडे, श्रीवल्लभ राठी,अशोक भगत, नारायणदास सिकची,  सौ. प्रेमा मुथा, डॉ. सुरेश मूथा,तसेच शेखर डावरे ,शिक्षक प्रतिनिधी अनिल तायडे,यांच्यासह प्राचार्या जयश्री उंडे, उपप्राचार्या सुनीता ग्रोव्हर,प्रा. अरविंद नवले यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवकवृंदाने सर्व यशवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक अध्यापकांचे कौतुक केले आहे.