Breaking News

माजी सैनिक संस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

माजी सैनिक संस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !
श्रीरामपूर/प्रतिनिधी :
         देवळाली प्रवरा येथील माजी सैनिक पतसंस्थेच्या वतीने आजी माजी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित  करुन गुणवंत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
                  माजी सैनिक पतसंस्थेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर प्रभाकर महांकाळ हे होते.मेजर विजय हरिश्चंद्रे यांचा मुलगा संकेत हरिश्चंद्रे याने नाशिक येथील आर्मी स्कुल मध्ये 12 विज्ञान शाखेत 91.4 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. मेजर भाऊसाहेब विठ्ठल मुसमाडे यांचा मुलगा शुभम मुसमाडे  यादोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देवळाली प्रवरा जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी भाऊसाहेब वाळके व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर प्रभाकार महांकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. 
                    यावेळी माजी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन  मेजर शरद चव्हाण, विलास उंडे ,दिलीप गुलदगड, चंद्रकांत देशमुख दत्ताञय कडू, विजय हरिश्चंद्रेआदी उपस्थित होते.