Breaking News

राळेगणसिद्धी येथे एकाने मास्क न लावता दारूच्या नशेत केला शांतता भंग !

राळेगणसिद्धी येथे एकाने मास्क न लावता दारूच्या नशेत केला शांतता भंग
 पारनेर प्रतिनिधी - 
   तालुक्यातील राळेगण सिद्धी येथे एक व्यक्ती तोंडाला मास्क न लावता व दारूच्या नशेमध्ये पोलिसांना आढळून आला आहे त्याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 21 रोजी आरोपी गणेश महादू पोटे व 31 वर्ष राहणार राळेगणसिद्धी ता.पारनेर जि.अ.नगर ही व्यक्ती राळेगणसिद्धी गावात यादव बाबा मंदिरासमोर राळेगण सिद्धी ता. पारनेर येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क न लावता दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी मोठ्यांनी आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुमित पांडुरंग आधाट यांनी दिली आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.