Breaking News

नगरच्या माजी आमदारासह कुटुंबाला कोरोना !

नगरच्या माजी आमदारासह कुटुंबाला कोरोना !
अहमदनगर/प्रतिनिधी
नगर शहरातील एका माजी आमदाराला कोरोना झाला असून, मुलासह त्यांच्या कुटुंबीयांचे रिपोर्टही पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हे आमदार कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून गेले होते. लोकांना मदत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मोबाईल आमदार म्हणूनही त्यांची शहरात खास ओळख आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना गुणाकाराला लागला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्व सामान्य रूग्णांसह डॉक्टरांनाही बाधा होत आहे. राजकीय नेत्यांनाही त्याने घेरले आहे. अनेक राजकीय पक्षातील लोकांना याची लागण झाल्याचे समोर येते आहे. जिल्ह्यात मागील पंधरवड्यापूर्वी एका आमदाराला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीचाही स्वॅब पॉझिटिव्ह आला. यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील बंगल्यातील टेलिफोन ऑपरेटर बाधित निघाल्याने मंत्री थोरात यांना क्वारंटाइन व्हावे लागले होते. आता कोरोना शहरातील एका माजी आमदाराला झाला असून, यंदा आमदारकी मिळाली म्हणून ते काम करायचे थांबले नाहीत. लोकांच्या संपर्कात आल्यानंतर बाधा होऊ शकते, याची जाणीव असूनही ते लोकसेवेसाठी कार्यरत राहिलेत. रविवारी त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट मंगळवारी आला. त्यात ते बाधित निघाले. त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी, मुलगा आणि सूनबाईंनाही कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेची माहिती शहरासह जिल्ह्यात वेगाने पसरली.