Breaking News

नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची शेतकरी मराठा महासंघाची मागणी !

नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची शेतकरी मराठा महासंघाची मागणी 
घोटण/प्रतिनिधी: 
तालुक्यातील ढोरजळगांव परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊन पिके जलमय झाल्यामुळे खरीप वाया जाणार आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फसले यांनी केली आहे.
 शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव मंडळामधील अनेक गावांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासुन मोठया प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे दोन दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठया प्रमाणावर पाणी साचुन तुर , कपाशी , बाजरी , मुग , सोयाबीन आदी नगदी पिके पाण्याखाली गेली आहेत तर अतिवृष्टी मुळे ढोरा नदी तसेच छोटेमोठे ओढे यांना मोठया प्रमाणात पुर येऊन नदी काठच्या शेतातील पिके वाहुन गेली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे ,
     कोरोना या विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असताना लॉक डाऊन मुळे रोजगार बुडाला तरी शेतकऱ्यांनी खचुन न जाता कर्ज घेऊन मशागत , पेरणी , खत  आदींचा भरमसाठ खर्च केला आहे , त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची महसुल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिकांची पहाणी करुन नुकसान ग्रस्त खरीप पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळवुन द्यावी  अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाने केली आहे .