Breaking News

राळेगणसिद्धी, साकळाई योजनेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा हिरवा कंदील.

राळेगणसिद्धी, साकळाई योजनेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा हिरवा कंदील.
----------
जयंत पाटील व आ. निलेश लंके यांची पुण्यात बैठक.
राळेगणसिद्धी व साकळाई योजनां संदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, 
 नीलेश लंके व अधीकारी यांची पुणे येथे बैठक पार पडली.

पारनेर  प्रतिनिधी -
 राळेगणसिद्धी तसेच साकळाई योजनांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला असून दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सोमवारी पुणे येथे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत देण्यात आले.
जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्‍नांसदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत अधिका-यांची पुणे येथे बैठक अयोजित केली होती. या बैठकीत पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धीसह नउ गावे तसेच नगर तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी आ. लंके यांनी केली. त्यावर या योजनांसाठी लागणा-या पाण्याची उपलब्धता ही कोकणामध्ये वाहून जाणारे अतितिरिक्त पाणी पूर्वेकडे वळविल्यानंतर उपलब्ध होणा-या पाण्यापासून होणार असल्याचे अधिका-यांनी यावेळी निुर्शनास आणून दिले. मंत्री पाटील यांनी पश्‍चिमवाहिनी नदयांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी या दोन्ही योजनांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सुचना या बैठकीत अधिका-यांना दिल्या. या सर्वेक्षणानंतर उपलब्ध होणा-या पाण्यातून साकळाई उपसा योजना तसेच राळेगणसिद्धीसह नउ गावांच्या योजनांना प्राधान्याने देण्याबाबत पाटील यांनी सहमती दर्शविली.
याच  बैठकीत आ. लंके यांनी पिंपळगांवजोगे डावा कालव्याच्या 58 ते 70 किलोमिटरपर्यंतो अस्तरीकरण करण्याची मागणी केली. त्यावर  अस्तरीकरणाचा प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याच्या सुचना पाटील यांनी दिल्या. पिंपळगांवजोगे कालव्यावरील पारनेर तालुक्यातील वितरीकांची उर्वरीत कामे तातडीने हाती घेण्याच्या आ. लंके यांच्या मागणीवर तसा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याच्या सुचना पाटील यांनी दिल्या. पिंपळगांव जोगा डावा कालव्याच्या शेवटी असलेल्या वडझिरे तलावापासून शिवडोह तलावापर्यंतच्या बंदिस्त नलिका लाईनचे काम पुर्ण करून पिंपळगांव जोगे धरणातील पाणी शिवडोह तलावापर्यंत पोहचविण्याचे काम तातडीने हाती घेण्यासंदर्भात या बैठकीत पाटील यांनी सुचना दिल्या. कुकडी डावा कालव्या वरील कि. मी. 31 एस्केप बांधून  जांबूतसह इतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश या बैठकीत पाटील यांनी दिले.
दरम्यान या बैठकीसंदर्भात  बोलताना आ. लंके यांनी सांगितले की आपण विधानसभेचे सदस्य झाल्यापासून  या दोन्ही योजनांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करीत होतो. दोन्ही योजनांमुळे शेतकरी वर्गाचा मोठा लाभ होणार असल्याची बाब आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पवार यांनीही या दोन्ही योजना कार्यान्वीत झाल्या पाहिजेत यावर सहमती दर्शविली होती. पवार यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण दोन्ही योजनांसाठी पाठपुरवा केला. व मंत्री जयंत पाटील यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही योजनांचे सर्वेक्षण, शिवडोह बंदीस्त नलीकेचे काम, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेणे, कालव्यांचे अस्तरीकरण याबाबत अधिका-यांना थेट आदेश दिल्याचे ते म्हणाले.