Breaking News

"परिक्रमा" सायन्स कॉलेज चा १००% निकाल !

"परिक्रमा" सायन्स कॉलेज चा १००% निकाल !
काष्टी :- 
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा ना श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट चे परिक्रमा सायन्स कॉलेज काष्टी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता बारावी सायन्सचा निकाल १०० टक्के लागला यामध्ये प्रथम कोंडे प्रज्वल ८५%, द्वितीय यावलींकर नलीन ७६%, तृतीय कोल्हार सोनाली ६१% या गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे  परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री.विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. व्ही एन पाटील, एम.बी.ए कॉलेजचे डायरेक्टर डॉ.तानाजी दबडे, प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ, प्राचार्य अमोल खेडकर, प्राचार्य जेम्स मेनन यांनी अभिनंदन केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची दिशा व त्याचे महत्त्व याचे मार्गदर्शन सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुदर्शन गिरमकर यांनी केले व शुभेच्छा दिल्या.